काही जुनी मराठी गाणी ऐकली आज. चिंब पावसाने रान झालं आबादानी, चोरीचा मामला, हृदयी वसंत फुलताना, एकाच या जन्मी जणू, वगैरे वगैरे.. आणि खरंच पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं. आता अशी गाणी ऐकल्यावर खरंतर तरुण झाल्यासारखं वाटलं असं म्हणायला हवं, पण आम्ही अजून म्हातारे झालेलो नाहीत. आणि आता हि आणि अशी सर्व गाणी मी माझ्या लहानपणी ऐकली त्यात माझा काय दोष बुवा? तर लहानपणी टीव्हीला अगदी नाक लावून हे सारे चित्रपट पाहिले. या गाण्यांचा मतितार्थ तेव्हा नाही कळला, पण आज परदेशी आपल्या पाखरापासून (चाणाक्ष वाचकांच्या लक्षात हे यावे) दूर राहिल्यावर मात्र या गाण्यांनी आत कुठेतरी गोड विरहवेदना निर्माण केली. या गाण्यांचं संगीत खरोखर कालातीत आहे हे शंभर टक्के पटलं. अगदी बसल्याबसल्या मला त्या काळात हे असं फिरवून आणलं. नॉस्टल्जिक केलं.
Prashant Phalle
Monday, April 18, 2016
Monday, February 29, 2016
हुरहूर नव्याने...
प्रियाराधन करण्याच्या काळात हुरहूर या प्रकाराशी खूप जवळून ओळख झाली होती. ती आता या परदेशवारीच्या निमित्ताने पुन्हा भेटायला आली.
आज का कोणजाणे पण घराची खूप आठवण येऊ लागली, येत आहे. त्यात खास गणपतीत वाजणारी गाणी लावून बसल्याने तर कडेलोटच व्हायची वेळ आली. घर, घरचे लोक, बायको आणि जेवण (हे सारे चढत्या क्रमाने :)) "मिस" होऊ लागलं. अगदी आतून हलल्यासारख झालं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं आयुष्यात महत्त्व नव्याने अधोरेखित झालं. आत्ता कुठे एक आठवडा उलटलाय, अजून अकरा आठवडे काढायचे आहेत, या कल्पनेने अंगावर अगदी काटा आला.

Saturday, February 20, 2016
लंडन वारी
आयुष्यातील पहिला परदेश प्रवास घडला. इंग्लंड. आणि आतापर्यंत बहुतेक वेळा 'जाऊन' आलेल्या अनेकांकडून ऐकलेली इकडची स्वच्छता प्रत्यक्ष अनुभवली. गाड्या चालवण्याची शिस्त मला पुण्यात खूप अपघातांचा अनुभव असल्याने विशेष भावली.
इथे अनेक सोयीसुविधा आहेत. त्याचं गुणवर्णन करून इतर अनेक परदेशी वारकऱ्यांची लाइन मी धरणार नाही. महत्वाची गोष्ट लक्षात आली ती हि कि इथल्या सामाजिक जीवनातील या स्वयंशिस्तीमुळे माणूस बऱ्याच अंशी समाधानी राहत असावा. पैसा आणि त्यामागे धावायची धडपड जगात सगळीकडे सारखीच. पण आपण भारतीय सामाजिक जीवनात अजून शिस्तीच्या बाबतीत मागेच, हे जाणवलं.
पुण्यात साधा रस्ता ओलांडायचा असो कि घरून कामावर जाणे असो, युद्धावर निघाल्यासारखी स्थिती होते. आयला इकडे लोक रमत गमत रस्ता क्रॉस करतात. :)

Tuesday, September 6, 2011
Tuesday, September 4, 2007
First blog
Subscribe to:
Comments (Atom)