Monday, February 29, 2016

हुरहूर नव्याने...

प्रियाराधन करण्याच्या काळात हुरहूर या प्रकाराशी खूप जवळून ओळख झाली होती. ती आता या परदेशवारीच्या निमित्ताने पुन्हा भेटायला आली.
आज का कोणजाणे पण घराची खूप आठवण येऊ लागली, येत आहे. त्यात खास गणपतीत वाजणारी गाणी लावून बसल्याने तर कडेलोटच व्हायची वेळ आली. घर, घरचे लोक, बायको आणि जेवण (हे सारे चढत्या क्रमाने :)) "मिस" होऊ लागलं. अगदी आतून हलल्यासारख झालं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं आयुष्यात महत्त्व नव्याने अधोरेखित झालं. आत्ता कुठे एक आठवडा उलटलाय, अजून अकरा आठवडे काढायचे आहेत, या कल्पनेने अंगावर अगदी  काटा आला.

No comments: